शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

Rajeev Satav : संसदरत्न राजीव सातव अनंतात विलीन; हजारो चाहत्यांनी साश्रुनयनांनी दिला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 12:20 PM

Rajeev Satav : खा. सातव यांच्या कुटुंबीयांचा व चाहत्यांचा आक्रोश मन गहिवरून येणारा होता.  

हिंगोली : कॉंग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान कळमनुरी येथे अंत्यविधी करण्यात आले. मुलगा पुष्कराज याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. त्यांच्या कुटुंबीयांसह हजारो चाहत्यांनी अंत्यदर्शन घेऊन साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला. अत्यंत शोकाकुल वातावरणात अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. खा. सातव यांच्या कुटुंबीयांचा व चाहत्यांचा आक्रोश मन गहिवरून येणारा होता.  शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

खा. राजीव सातव यांना २३ एप्रिल राेजी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने २६ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना फुप्फुसात न्यूमाेनियाचा संसर्ग झाला. प्रकृती बिघडत गेली व रविवारी पहाटे खा. सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर रविवारी रात्री त्यांचे पार्थिव कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातून चाहत्यांनी कळमनुरी येथे सोमवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. सकाळी ८ वाजेपासून निवास्थानासमोर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन, सामाजिक अंतर ठेवत त्यांचे हजारो चाहते, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्षातील नेते येथे अंत्यदर्शनासाठी आले होते. अंत्यदर्शन घेत असताना कुटुंबीयांसह त्यांच्या अनेक चाहत्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अंत्यविधीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत,पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मंत्री असलम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, सतेज पाटील, आ.अमर राजूरकर, आ.बालाजी कल्याणकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, रामराव वडकुते, गजानन घुगे, प्रकाश पाटील देवसरकर, माजी खासदार शिवाजी माने, तुकाराम रेंगे, माजी आ.संतोष टारफे, माजी आ.विजय खडसे तसेच गुजरात मधील विरोधी पक्षनेते धनानी, काँग्रेस नेते रेड्डी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंदल, विश्वजीत तांबे, यांच्यासह देशभरातून आलेले अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. 

पंचायत समिती सदस्य ते संसद थक्क करणारा प्रवासकळमनुरी तालुक्यातील मसोड येथील मूळ असलेले अॅड. सातव यांचा पंचायत समिती सदस्य ते खासदार असा प्रवास थक्क करणारा प्रवास अकाली थांबल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आई रजनी सातव यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात त्यांनी चमक दाखवली. उत्तम संघटनकाैशल्य, संयमी व सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात ओळख निर्माण केली. काँग्रेसच्या वरिष्ठांच्या बैठकीतील धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. सन २००९ मध्ये ते कळमनुरी विधानसभेचे आमदार झाले. ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षही हाते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये मोदी लाटेतही ते विजयी झाले. २०२० मध्ये त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. संसदेतील त्यांच्या लक्षवेधी व अभ्यासपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

टॅग्स :Rajeev Satavराजीव सातवHingoliहिंगोली