फवारणी करताना दक्षतेची जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:58 IST2019-09-23T23:57:46+5:302019-09-23T23:58:03+5:30
कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील एका शेतमजुराचा सततची औषध फवारणी व गळतीमुळे विषबाधा झाल्याने मृत्यू झाला.

फवारणी करताना दक्षतेची जनजागृती करा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील एका शेतमजुराचा सततची औषध फवारणी व गळतीमुळे विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे सतत फवारणी करू नये, असे आवाहन करून घ्यावयाच्या दक्षतेबाबत जनजागृतीचा ठराव जि.प.च्या कृषी समितीत घेण्यात आला.
सभापती प्रल्हाद राखोंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी डॉ.सतीश पाचपुते यांनी पोतरा येथील मयत शेतमजूर उमाजी रणवीर यांना मदत व्हावी, अशी मागणी केली. कृषी अधिकारी ए.आर. डुब्बल यांनी तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे सांगितले. तर जगजागृतीबाबत कपासीचे क्षेत्र असलेल्या भागासह सर्वच भागांत कृषीने काम करावे, असे रत्नमाला चव्हाण म्हणाल्या. कृषी सभापती राखोंडे यांनी कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील प्रगतिशील व खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव जाण्यासाठी कृषीच्या अधिकाºयांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येक तालुक्यातून त्यासाठी शेतकºयांची माहिती संकलित करण्यास सांगितले.
कृषी विकास योजनेत एसएपी, टीसपीला जसा निधी मिळतो, तसाच ओटीएसपीलाही मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी डॉ.पाचपुते यांनी केली. यावेळी सभापती भीमराव भगत, उत्तम आसोले आदींची उपस्थिती होती.