शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
3
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
4
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
5
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
6
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
7
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
8
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
9
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
10
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
11
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
12
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
13
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
14
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
15
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
16
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
17
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
18
Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
19
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
20
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!

हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर; हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:36 IST

कुरुंद्यात पुन्हा पाणी घुसले: येहळेगाव सर्कलमधील पिकांची दाणादाण

ठळक मुद्देकुरुंदा येथे नदीला महापूर अनेक घरात पाणी शिरले हिंगोलीतील इंदिरानगरात पाणी घुसले

हिंगोली : जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून जमिनी चिभडण्याची भीती निर्माण झाली आहे. कुरुंदा गावात पुन्हा पाणी शिरले तर हिंगोलीतही इंदिरानगरातील २0 ते २५ घरांत पाणी घुसले. कयाधूलाही चांगला पूर आल्याचे पहायला मिळाले. औंढा तालुक्यातील येहळेगाव सर्कलमध्ये तब्बल ९५ मिमी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. आज पहाटे ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २५.२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात हिंगोली-२५.२९, कळमनुरी १८.१७, वसमत २६.४३, सेनगाव ६.५0, औंढा नागनाथ ५0 मिमी असे पर्जन्य झाले आहे. सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा ८५ मिमी, येहळेगाव ९४ मिमी, औंढा नागनाथ ६४ मिमी अशी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने या मंडळांत हाहाकार उडाला आहे. येहळेगाव सर्कलमधील मेथा, जडगाव आदी भागात शेतशिवारात पाणीच पाणी झाले. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. जडगावात शाळेत पाणी घुसले होते.

कुरुंद्यात पुन्हा गावात पाणीकुरुंदा येथे २९ जुलै २0१६ नंतर पुन्हा एकदा गावात पाणी शिरले आहे. या गावात नदीवरील पुलाच्या व रस्त्याच्या कामामुळे पाण्याला जाण्याचा मार्ग नसल्याने पाणी घुसले आहे. त्यामुळे गणेशनगर, साठेनगर, साईबाबा गल्ली, श्रीवास्तीनगर या भागातील घरांता मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे गावकºयांत भीतीचे वातावरण होते.

हिंगोलीतील इंदिरानगरात पाणी घुसलेहिंगोली शहरातील इंदिरानगर भागातही पाणी घुसले असून २0 ते २५ घरांत पाणी घुसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

नर्सीनजीक पुलावरून पाणीनर्जीनजीक नाल्याचे पाणी पुलावरून जात होते. जवळपास एक किमी परिसरात हे पाणी पसरल्याने रस्त्यासह शिवारातही पाणीच पाणी दिसत होते. या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने सेनगाव व हिंगोलीचा संपर्क बंद झाला होता. मागील वीस ते पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच असा पाऊस पडल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

नांदापूरला नदीच्या पाण्याचा वेढाकळमनुरी तालुक्यातील नांदापूरला नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने गावातून बाहेर जाणे अवघड झाले होते. कालच्या पावसाने कयाधूला मोठा पूर आल्याने आज सकाळीच नदीचे पाणी पात्रातून ओसंडून वाहत होते. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले.

औंढ्यातही ओढ्याला पूरऔंढ्यातही ओढ्याला पूर आल्याने दरेगावमार्गे जाणाºया रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे तासभर वाहतूक खोळंबली होती. सकाळचे दूधवाले, मॉर्निंग वॉक करणारे यामुळे अडकून पडले होते.

कुरुंदा येथे नदीला महापूर अनेक घरात पाणी शिरले कुरुंदा येथे बुधवारी रात्री झालेल्या धो धो पाऊसमुळे नदीचे पाणी ओसंडून रस्त्याने वाहत होते.नदीवरील पुलाच्या व रस्त्याच्या कामामुळे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने गावात पाणी येत होते त्यामुळे गणेश नगर ,साठे नगर,साईबाबा गल्ली ,श्रीवास्तीनगर   या भागातील घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते.त्यामुळे गावकऱ्यांत भीती पसरली होती.ग्रा प च्या पाठीमागील भागातील पाणी नळ्या जात नसल्याने ते पाणी गणेशनगर मध्य शिरत होते.अनेक शेतात देखील नदीचे पाणी शिरले तर नदी ओलांडून वाहत होती त्यामुळे कुरुंदा ते टोकाई रस्ता बंद पडला आहे.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीagricultureशेती