शेवाळा येथे जुगार अड्ड्यावर छापा ; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST2021-07-27T04:31:07+5:302021-07-27T04:31:07+5:30

शेवाळा शिवारात जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून या पथकाने छापा ...

Raid on gambling den at Shewala; Property worth Rs 5 lakh confiscated | शेवाळा येथे जुगार अड्ड्यावर छापा ; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

शेवाळा येथे जुगार अड्ड्यावर छापा ; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

शेवाळा शिवारात जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून या पथकाने छापा टाकला असता काहीजण गोलाकार बसून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, मोबाईल, कार तसेच रोख रक्कम असा ४ लाख ८२ हजार ६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोशि सुरज भिसे यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत कोंडबा डुकरे (रा. आखाडा बाळापूर), रिकूसिंग विजेंद्रसिंग कामठा (रा. कामठा हमु. नांदेड), देवानंद किशनराव चव्हाण (उंचाडा ता. हदगाव), गजानन माणिकराव मोरे (रा. बरड शेवाळा), सुधाकर विठ्ठल कदम (रा. तिवरंग), बाळासाहेब धोंडबाराव सोळंके (रा. हस्तरा), देवानंद मारोतराव आणेवार (रा. करमोडी) यांच्याविरूद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. तपास पोह एस.एल. मार्के करीत आहेत.

Web Title: Raid on gambling den at Shewala; Property worth Rs 5 lakh confiscated