सेनगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST2021-08-29T04:29:05+5:302021-08-29T04:29:05+5:30

सेनगाव शहरातील येलदरी टी पाॅइंट परिसरात झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती सेनगाव पेालिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस ...

Raid on gambling den at Sengaon | सेनगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा

सेनगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा

सेनगाव शहरातील येलदरी टी पाॅइंट परिसरात झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती सेनगाव पेालिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे यांच्या पथकाने छापा टाकला असता सहा जण झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, मोबाइल व रोख रक्कम असा १ लाख २३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे यांच्या फिर्यादीवरून विश्वनाथ लक्ष्मण सांगळे (रा. मकोडी), गजानन रामचंद्र मगर (रा. मकोडी), शरद तुळशीराम मंडलिक (रा. सवड ता. रिसोड) नितीन रमेश अग्रवाल (रा. सिव्हिल लाइन रिसोड), शिवाजी तुकाराम गरकळ (रा. समर्थ नगर रिसोड), मयुर बाजीराव पोले (रा. जामदया) याचेविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह झळके करीत आहेत.

Web Title: Raid on gambling den at Sengaon