‘Protect vegetables from sucking insects’ | ‘रसशोषण करणाऱ्या किडीपासून भाज्यांचे संरक्षण करावे’

‘रसशोषण करणाऱ्या किडीपासून भाज्यांचे संरक्षण करावे’

वेलवर्गीय भाजीपाला पिके सध्या फळधारणा ते फळ वाढीच्या अवस्थेत आहेत. पिकास पाण्याचा ताण बसल्यास फुलगळ होत असते. म्हणून पिकास नियमित पाणी देणे गरजेचे आहे. काढणीस तयार असलेल्या खरबूज व टरबूज पिकांची काढणी करून घ्यावी.

जनावरे योग्य ठिकाणी बांधावी

वादळीवारा, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जनावरांना उघड्यावर बांधू नये. जनावरांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. जनावरे पावसात भिजणार नाहीत, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याची काळजी घ्यावी. चारा भिजल्यास जनावरे खात नाहीत. विशेष म्हणजे चारा भिजल्यास त्याची प्रतही खालावते. त्यामुळे चारा योग्य ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषीतज्ज्ञांनी केले आहे.

Web Title: ‘Protect vegetables from sucking insects’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.