शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टीचा वाद गेला विकोपाला; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 14:47 IST

प्रथम दर्शनी विचारपूस करताच मुलानेच बापाला संपविले, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

वसमत (जि. हिंगोली) : शहरातील बसस्थानकासमोर ६५ वर्षीय बापास पोटच्या लेकाने धारदार शस्त्राने पोटावर वार करून संपविले. काही क्षणात ही घटना घडली. बघ्यांना काही कळण्याआधीच खून करणाऱ्याने दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजेदरम्यान घडली.

वसमत शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये १८ ऑक्टोबर रोजी सकाळी अंबाजी गायकवाड (वय ६५, रा. गणेशपूर, ह.मु. औरंगाबाद) हे बसले होते. अचानक त्यांच्या पोटच्या मुलासह तिघे त्यांच्या दिशेने आले. धारदार खंजीरने त्यांच्या पोटावर वार करून इतरांना काही कळण्याआधीच दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना कळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. प्रथम दर्शनी विचारपूस करताच मुलानेच बापाला संपविले, अशी माहिती त्यांना मिळाली. पसार झालेल्या तिघांचा शहर पोलीस ठाण्याचे पथक शोध घेत आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा खून प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. 

मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखलया प्रकरणी मृताच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ अंबाजी गायकवाड ( रा. खंदारबन जवळा, वसमत) , राजू श्रावणे ( रा. वापटी, वसमत ) , उत्तम गजभारे, सुमेध उत्तम गजभारे ( दोघे रा. टाकळगाव, वसमत ), गोविंद धुराजी मुळे ( औंढा) अशी आरोपींची नावे आहेत.  

मारेकऱ्यांचा पोलीस घेत आहेत शोध...खून करून पसार झालेल्या आरोपींचा शोध दोन पोलीस पथक घेत आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेतल्या जाईल. अंबाजी गायकवाड यांचा मारेकरी त्यांचा मुलगा आहे. त्याच्यासोबत इतर काहीजणांचा यात समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.- चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, वसमत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीAurangabadऔरंगाबाद