हेडगेवार डेंटल मेडिकल काॅलेज येथे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST2021-01-23T04:30:26+5:302021-01-23T04:30:26+5:30

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थापक स्व. ब्रिजलाल खुराणा यांच्या प्रतिमेला ...

Program at Hedgewar Dental Medical College | हेडगेवार डेंटल मेडिकल काॅलेज येथे कार्यक्रम

हेडगेवार डेंटल मेडिकल काॅलेज येथे कार्यक्रम

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थापक स्व. ब्रिजलाल खुराणा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी डॉ. सी. बी. झंवर, सतीश विडोळकर, डॉ. हंसराज खुराणा, राज खुराणा, डॉ. विवेक चौकसे, संस्था अध्यक्ष ललित खुराणा, डॉ. रामदेव अग्रवाल, डॉ. राजेश चाटोरीकर, डॉ. आंनद साळवे आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्वात छोट्या जिल्ह्यात स्व. ब्रिजलाल खुराणा आणि त्यांच्या परिवाराने डेन्टल मेडिकल कॉलेज सुरु करून या भागातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच तीन महिन्यांआधी कोरोनाच्या काळात प्रोस्थोडेन्टिक्स दिवस साजरा करता आला नसता. मात्र, आता कोरोनाची लाट ओसरत आहे. त्यामुळे ही कार्यशाळा घेता आली. सोशल अंतर ठेवा, तोंडाला मास्क लावा, असा संदेश यावेळी दिला. डॉ. झंवर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो आहे

Web Title: Program at Hedgewar Dental Medical College