ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:28 IST2018-08-02T00:28:10+5:302018-08-02T00:28:25+5:30
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली शहरातून १ आॅगस्ट रोजी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव, तरुण व नागरिक सहभागी झाले होते.

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली शहरातून १ आॅगस्ट रोजी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव, तरुण व नागरिक सहभागी झाले होते.
हिंगोली शहरातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जानकी गायकवाड यांच्या हस्ते झाले. ध्वजारोहण सेनगाव येथील नगरसेविका अनुराधा सुतार यांनी केले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरेत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी जयंती मंडळाच्या अध्यक्षा बेबीताई आठवले, कार्याध्यक्षा कुसुमताई हानवते, उपाध्यक्षा मीरा गायकवाड, सचिव सुशीला आठवले, सहसचिव दुर्गा कांबळे, नंदा मस्के, लक्ष्मीबाई गायकवाड, द्रौपदा शिखरे, जनाताई लोखंडे, लता लोंढे, चंदा ठोके, वंदना खरात, लता सूर्यवंशी, चंद्रकला शिखरे, यशोदा कोरडे, सविता लांडगे, कमल ठोके, तसेच माजी नगराध्यक्ष बबन शिखरे, जिल्हाध्यक्ष डॉ. रवि थोरात, बबन सुतार, प्रकाश इंगोले, साहेबराव कांबळे, आनंद शिखरे, विलास मंडलिक, पंडित कांबळे आदी उपस्थित होते. आनंददायी वातावरणात जयंती उत्साहात पार पडली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.