लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वसमत शहराच्या हद्दीत मटका खेळवणाऱ्या एकास तर जुगार खेळणाºया सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. शनिवारी कौठा रोड भागात ही कारवाई करण्यात आली.वसमत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसमत कवठा रोडवर पेट्रोल पंपाचे समोर भोसले यांच्या शेतात वॉटर फिल्टरच्या बाजूस झन्ना-मन्ना जुगार खेळत असताना सात जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख ९६३० रुपये, २५ हजारांचे ६ मोबाईल ४५ हजारांच्या २ मोटारसायकली असा ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यात रमेश शंकरलाल तोष्णीवाल, रोहित शंकरराव मदीलवार, अक्षय रमेश भोसले, भीमराव रंगनाथराव गडगील, प्रशांत लक्ष्मणराव कल्याणकर, प्रवीण अनंतराव पटवे, गजानन कुंडलिकराव अंकमवार या सात जणांना पकडले. स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश राठोड, बालासाहेब बोके, संभाजी लकुळे , शैलेश चौधरी, आशिष उंबरकर, गजानन राठोड, शंकर ठोंबरे, भगवान आडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याचबरोबर शहरातील एका मटकाचालकास अटक करून १७७0 रुपये जप्त केले.अवैध दारूसाठा जप्त; गुन्हा दाखलहिंगोली : नर्सी नामदेव पोलीस ठाणे हद्दीत ७ डिसेंबर रोजी एका ठिकाणी पोलिसांनी छापा मारून ७२८ रूपयांचा देशी दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाभरात छुप्या पद्धतीने सर्रासपणे दारूविक्री होत आहे. पोलीस प्रशासनाकडून दरदिवशीव दारूबंदी कायद्या अंतर्गत मोहीम राबवूनही कारवाई केली जात असली तरी, चोरट्या दारूविक्रीला आळा बसत नाही.
वसमतमध्ये जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:42 IST