शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

हळदीची दरवाढ; आवक कमी

By admin | Updated: February 13, 2015 15:21 IST

आठवड्यापासून /हळदीच्या दरात होत असलेली वाढ उत्पादकांचा पदरात पडत नाही. अद्याप माल हातात आला नसल्याने व्यापार्‍यांचे चांगभले होत आहे.

हिंगोली : /आठवड्यापासून /हळदीच्या दरात होत असलेली वाढ उत्पादकांचा पदरात पडत नाही. अद्याप माल हातात आला नसल्याने व्यापार्‍यांचे चांगभले होत आहे. बुधवारी किमान ६८00 रूपये तर किमान ८0१५ रूपयांचा दर मिळाला. परंतु हंगामात ५ हजारावर असलेली आवक केवळ ७९५ क्विंटलावर होती. 

हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी राज्यात प्रसिद्धआहे. सांगलीनंतर येथील बाजारात मोठय़ा प्रमाणात आवक असते. सोबत वसमतलाही शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. खरेदीनंतर लगेचच पैसा हातात पडत असल्यामुळे हिंगोलीत खरेदीचे आकडे चढे असतात. अद्याप नवीन हळद शेतकर्‍यांच्या हाती पडली नाही. तरीही आठवड्यापासून दरवाढ होत आहे. राज्यभरातील बाजार समित्यांतील भाव वधारले आहेत. बुधवारी हिंगोलीतील दरांनी आठ हजाराचा आकडा गाठला. सकाळी ६८00 रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ झाली. कमाल दर ८0१५ रूपयांपर्यंत गेला. याहीपेक्षा सांगली बाजारपेठेत किमान ७२00 आणि कमाल १३ हजार ६00 रूपयांचा दर होता. दोन्हीपेक्षा मुंबई बाजार समितीत किमान १0 हजार ८00 होता. कमाल १४ हजार ८00 रूपयांवर गेला. त्याचा फायदा उत्पादकांऐवजी व्यापार्‍यांना झाला. नवीन हळद काढणीला आली नसल्याने शेतकर्‍यांच्या हाती माल नाही. महिन्यानंतर माल हातात येण्याची शक्यता आहे. तेव्हा बाजाराचे दर घसरण्याची शक्यता असते. प्रतिवर्षीचे हे चित्र असल्याने वाढलेल्या दराबाबत शेतकर्‍यांना तितकी आस्था नाही. पुढील महिन्यात अधिक दरांची अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. /(प्रतिनिधी)

कळमनुरी हिंगोली

■ बाजारपेठीची उपलब्धता असली तरी जिल्ह्यात हळद लागवड कमी आहे. पाण्याची व्यवस्था नसल्याने वसमत वगळता चारही तालुक्यात लागवडीखाली क्षेत्र २ हजार हेक्टरही नाही. यंदाच्या दुष्काळामुळे लागवडीत घट झाली. त्यात अत्यल्प पर्जन्यामुळे अपेक्षित उत्पादनाची कमी शक्यता आहे. हिवाळ्यात आलेल्या धुईमुळे हळदीवर रोगांचा हल्ला झाला होता. करप्या रोगही हळदीला मारक ठरला.

 

■ बाजार समितीत प्रत्येक मालाची आवक कमी आहे. खरीप पीकच हातात पडले नसल्याने रबीचा विषयच नाही. हळदीचीही हीच अवस्था होणार असल्याने हळदीवर प्रक्रिया उद्योगालाही माल मिळण्याची शक्यता कमी आहे.