मसोड ते कनका रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:24+5:302021-02-05T07:52:24+5:30
बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत ...

मसोड ते कनका रस्त्याची दुरवस्था
बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन बसस्थानकाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
शहर व परिसरात विजेचा लपंडाव
कळमनुरी : शहरासह परिसरातील ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. तसेच पिकांना पाणीही देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी
हिंगोली : शहरातील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांना हॉटेलमध्ये जाऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत प्रवाशांनी वेळोवेळी पाण्याची मागणी केली; परंतु, कोणीही अद्याप लक्ष दिले नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
‘हरभऱ्यावर फवारणी करावी’
हिंगोली : हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी २० मि. लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोट ३० टक्के १३ मि.लि. किंवा असिफेट ७५ टक्के १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.
हरितद्रव्याची कमी दिसल्यास फवारणीचा सल्ला
हिंगोली : आंबे बहार, संत्रा-मोसंबीस बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबे बहार, संत्रा-मोसंबी बागेमध्ये पानावर हरितद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास बागेत झिंक सल्फेट पाच ग्राम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा मोसंबी फळांची काढणी करावी. आंबे बहार डाळिंब बागेत पाणी व्यवस्थापन करावे. चिकू बागेस पाणी द्यावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.