शिरडशहापूर येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST2021-01-08T05:38:35+5:302021-01-08T05:38:35+5:30
वाशिम रोडवर गतिरोधकाची मागणी हिंगोली: शहरातील वाशिम रोडवर शासकीय विश्रामगृहाजवळ वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या रस्त्यावरुन वाहने ...

शिरडशहापूर येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था
वाशिम रोडवर गतिरोधकाची मागणी
हिंगोली: शहरातील वाशिम रोडवर शासकीय विश्रामगृहाजवळ वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या रस्त्यावरुन वाहने वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे झाले आहे. वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.
अनियमित वीजपुरवठा; शेतकरी त्रस्त
शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरात पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे रबी हंगामात पिकांची उगवण झाली आहे. परंतु, पंधरा दिवसांपासून वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत.महावितरण कंपनीने याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.