शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्य बजावताना अपघातात जखमी पोलीस निरीक्षकांचा मृत्यू, मुळगावी झाले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:05 IST

कर्तव्य बजावताना नाशिक येथे अपघातात झाले होते जखमी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

वसमत: पोलीस निरीक्षक गजानन सैंदाने हे नाशिक येथे कर्तव्य बजावत होते. कर्तव्य बजावत असताना ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आला. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर त्यांना सोमवारी मृत्यूने कवटाळले. मंगळवारी वसमत येथिल स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.

वसमत शहरातील रहिवासी असलेले पोलीस निरीक्षक गजानन सैंदाने हे नाशिक येथे कार्यरत होते. नाशिकमधील एका चौकात कर्तव्य बजावत असताना दुचाकी बॅरिकेटला धडकली. ते बॅरिकेट पोलीस निरीक्षक गजानन सैंदाने यांच्या अंगावर येऊन पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार करण्यात आले. त्यानंतरही उपचारामध्ये प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 

२० फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. वसमत येथील स्मशानभूमीत २१ फेब्रुवारी रोजी ३ वाजेदरम्यान  त्यांच्यावर शासकीय इतमामात मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. अंत्यसंस्कारास राज्य भरातील अधिकारी कर्मचारी,त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूPoliceपोलिस