चोरट्यांच्या मागावर पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:28 AM2019-02-10T00:28:17+5:302019-02-10T00:28:32+5:30

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे चाकूचा धाक दाखवून लुटमारीच्या घटनाही वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध पोलीस ठाणे हद्दीत चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यातील चोरट्यांच्या मागावर पोलीस आहेत. मात्र ते सापडत नाहीत.

 Police behind the thieves | चोरट्यांच्या मागावर पोलीस

चोरट्यांच्या मागावर पोलीस

Next

दयाशिल इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे चाकूचा धाक दाखवून लुटमारीच्या घटनाही वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध पोलीस ठाणे हद्दीत चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यातील चोरट्यांच्या मागावर पोलीस आहेत. मात्र ते सापडत नाहीत.
जिल्ह्यात चोरी, घरफोडी लुटमारीच्या घटना घडत आहेत. त्यात घरासमोरील वाहने, दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे वाहनधारकांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. सार्वजनिक ठिकाणावरून महिलेच्या गळ्यातील पोत चोरून नेल्याच्या घटनाही वाढत आहेत. व्यापारी, वाटसरू, प्रवाशांना लुटले जात आहे. याप्रकरणी ठाण्यात गुन्हे दाखल असले असले तरी, प्रत्येक्षात या चोरट्यांचा शोध घेणे गरजेचे असून तशी मागणीही नागरिकांतूनआहे. पोलीस चोरट्यांच्या मागावर आहेत, परंतु चोरीच्या दाखल गुन्ह्यांची संख्या पाहता बोटावर मोजता येतील एवढ्याच घरफोडी व चोरीच्या घटना उघडकीस आणण्यास पोलीसांना यश आले आहे. विविध चोरी व घरफोडीच्या घटनेतील आरोपींची शोध मोहीम सुरूच आहे.
घरफोडी, लूटमार प्रकरणातील आरोपींची शोध मोहीम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गंभीर घरफोडी व चोरी प्रकरणातील गुन्हे उघडकीस आणले आहेत. नागरिकांनी दक्ष राहावे, कोणावर संशय किंवा अधिक माहिती असल्यास पोलिसांना कळवावे.
-पोलीस अधीक्षक योगेश कुमार.
दोन दिवसांत दाखल चोरीचे गुन्हे...
४हिवरा जाटू येथील शेतशिवारातील पाईप चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिवरा जाटू येथील मधुकर कचरू काशिदे यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांच्या शेतातील चोरट्यांनी २१०० रूपये किंमतीचे पाईप चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४हिंगोली शहरातील तापडिया इस्टेट परिसरातून चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी व्यापारी रामदास पाटील यांच्या फिर्यादीवरून ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथून घरासमोर बांधलेला अंदाजे २० हजार रूपये किंमतीचा बैल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी परमेश्वर कापसे यांनी ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी ८ फेबु्रवारी रोजी हिंंगोली ग्रामीण ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकू व पिस्तुलाच्या धाकावर लुटले
४पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून लुटमारीच्या घटनाही वाढत आहेत. रस्त्यात अडवून बळजबरीने मुद्देमाल व जवळील साहित्य लंपास केले जात आहे. हिंगोली-परभणी मुख्य रस्त्यावरील हट्टा आडगाव रंजे परिसरातून दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाºयास व त्यांच्यासोबतच्या दोन साथीदारांना मारहाण करत पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना २ डिसेंबर २०१८ रोजी घडली होती. परभणी येथील दीनाराम दर्गाराम चौधरी वसुली करून दुचाकीने साथीदारांसह परभणीकडे जात असताना चोरट्यांनी तसेच पिस्तुलचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड पळविली होती. या घटनेतील आरोपींचा अद्याप शोध लागला नाही. प्रकरण पोलीस तपासावर आहे.
४सराफा व्यापाºयास लुटल्याची घटना
घोटादेवी-हिंगोली रस्त्यावरून जात असताना एका सराफा व्यापाºयास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना २८ जानेवारी रोजी घडली होती. हिंगोली येथील भास्कर दत्तूपंत खर्जुले हे नर्सी येथील त्यांचे सराफा दुकान बंद करून दुचाकीने हिंगोलीकडे येत होते. तेवढ्यात दुचाकीवरील तिघांनी व्यापारी खर्जुले यांचा पाठलाग करत त्यांना रस्त्यात अडविले. चाकूचा धाक दाखवून लुटारूंनी ५० हजार ५०० रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिन्याने भरलेली बॅग पळविली होती.
४गळ्यातील पोत पळविली
हिंगोली शहरातील जिजामातानगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना २ फेबु्रवारी रोजी घडली होती. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
४तर हिंगोली येथील बसस्थानकातून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी पळविल्याची घटना १७ जानेवारी रोजी घडली होती. बसस्थानक परिसरात पोलीस संरक्षणाअभावी या ठिकाणी नेहमीच पाकीटमार किंवा प्रवासी महिलांचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडतात. परंतु याकडे आगारप्रशासन व पोलीस प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही, हे विशेष.
४दुचाकी चोरटे सक्रिय
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच घरासमोरील वाहने चोरीस जात आहेत. गतवर्षी २०१८ मध्येही दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दुचाकी चोरीचे सत्र अजूनही सुरूच आहे. वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमुळे वाहनधारकांतही भीती निर्माण झाली आहे.

Web Title:  Police behind the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.