खिशातील रोकड पळविली; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:02 IST2018-10-07T00:02:37+5:302018-10-07T00:02:57+5:30
ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेल्या चालकाच्या खिशातील साडेसहा हजार रूपये व एक मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी वसमत शहर ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खिशातील रोकड पळविली; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेल्या चालकाच्या खिशातील साडेसहा हजार रूपये व एक मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी वसमत शहर ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मखनसिंग विक्रमसिंग पटेल हे ट्रकचालक त्यांच्या ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपले होते. यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी मखनसिंग यांच्या खिशातील साडेसहा हजार रूपये व एक मोबाईल चोरला. तसेच मखनसिंग यांच्या पुतन्यास चोरट्यांनी रॉडचा धाक दाखवून मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी वसत शहर ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूळा येथे महावितरणच्या विद्युत तारांवरून आकडा टाकून ३९ हजार ९६० रूपये किंमतीची वीजचोरी केल्याप्रकरणी शिवाजी सावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.