शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट खरेदी - विक्री करणाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

वसमत : गुंठेवारी रजिस्ट्री करण्यासाठी तहसीलदारांची खोटी स्वाक्षरी व राजमुद्रा असलेला बनावट शिक्का वापरल्याप्रकरणी वसमत शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा ...

वसमत : गुंठेवारी रजिस्ट्री करण्यासाठी तहसीलदारांची खोटी स्वाक्षरी व राजमुद्रा असलेला बनावट शिक्का वापरल्याप्रकरणी वसमत शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर तलाठ्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकाराने वसमत येथे ग्रामपंचायत एन.ए. हा बनावट ले-आऊट व बनावट प्रमाणपत्रे तयार करून प्लॉटची खरेदी - विक्री करणाऱ्यांचे माेठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

वसमत शहराच्या हद्दीबाहेर आसेगाव-परभणी रस्त्यावर असलेल्या सर्वे नंबरमध्ये बनावट एन.ए. ले-आऊट तयार करून प्लॉट विक्रीचा सपाटा सुरू आहे. ग्रामपंचायतीने नमुना नंबर आठ दिल्याने व दुय्यम निबंधक कायार्लयात रजिस्ट्री करुन देणाऱ्यांची साखळी असल्याने हा धंदा जोरात सुरू आहे. नांदेड, परभणी रस्त्यावरही असाच प्रकार सुरू आहे. बनावट प्रमाणपत्राद्वारे गुंठेवारी रजिस्ट्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असताना खुद्द तहसीलदारांचीच बनावट स्वाक्षरी व तहसीलचा शिक्का असलेले प्रमाणपत्र सादर करून प्लॉटची रजिस्ट्री करण्याचा प्रकार समोर आला आहे.

तहसीलदार अरविंद बोलंगे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले व गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. तलाठी माधव भुसावळे यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली की, दुय्यम निबंधकाच्या नावाने बनावट परवानगीपत्र तयार करून त्यावर तहसीलदार वसमत यांची स्वाक्षरी करून खरेदीखत दस्त नोंदणी करून दिली. राजमुद्रा असलेला तहसील कार्यालयाचा शिक्का तयार करुन त्याचा गैरवापर केला असल्याचे नमूद आहे. या तक्रारीवरुन संजय दशरथे, भगवान दशरथे, रामराव दशरथे (सर्व रा. परळी ता. वसमत) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खरेदी - विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी या शेतकऱ्यांना रजिस्ट्री करून देण्यासाठी हे बनावट प्रमाणपत्र कोणी दिले, तहसील प्रमाणपत्राची पडताळणी न करता दस्तनोंदणी कशी केली, याची चर्चा शहरात होत आहे.