पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:29 IST2018-05-28T00:29:59+5:302018-05-28T00:29:59+5:30
दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत असून ते सामान्यांना परवडणारे नाही. सरकारच्या या धोरणामुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २७ मे रोजी शहरातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीच्या विरोधात गांधीगिरीने आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत असून ते सामान्यांना परवडणारे नाही. सरकारच्या या धोरणामुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २७ मे रोजी शहरातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीच्या विरोधात गांधीगिरीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी पेट्रोल पंम्पच्या मशीनला हार घालून इंधन दरवाढीच्या विरोधात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलनात राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, जि. प. सदस्य मनीष आखरे, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, नगरसेवक खय्युम पठाण, माऊली जगताप, केशव शांकट, विनोद नाईक, मनोज बांगर, पंकज बांगर, उरेवार, इरफान पठाण, असिफ गौरी, इमाम बेलदार, रशीद तांबोळी, अनिल घुगे, गजानन सानप, अविनाश बांगर, रवी घुगे, सूरज बांगर, विकास सोनटक्के यांच्यासह राष्टÑवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलन करूनही पेट्रोल-डिझेलचे दर कमी न झाल्यास आंदोलनाचा ईशारा राष्टÑवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आला.