वसमत येथे एकाचा उष्माघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:33 IST2019-05-02T18:33:23+5:302019-05-02T18:33:50+5:30
वसमत जवळील कळलावी परिसरात एका ईसमाचा मृतदेह आढळला.

वसमत येथे एकाचा उष्माघाताने मृत्यू
वसमत (हिंगोली ) : वसमत जवळील कळलावी परिसरात एका ईसमाचा मृतदेह आढळला होता. मयताची ओळख पोलीसांनी पटवली आहे. सदर ईसमाचा उष्माघातानेमृत्यू झाला असावा असा अंदाज वसमत ग्रामीण पोलीसांनी व्यक्त केला.
वसमत जवळील कळलावी शिवारातील शेतातील झाडाखाली ४५ वर्षीय इसमाचे प्रेत गुरूवारी दुपारी आढळले होते. सदर इसमाचे नाव आसाराम एकनाथराव पांचाळ (रा. जवळा बाजार ह.मु. धामनगाव) असल्याचे स्पष्ट झाले. सदर ईसम उष्माघाताने दगावला असावा, असा अंदाज जमादार निवृत्ती बडे यांनी व्यक्त केला. घटनास्थळी सपोउपनी कांबळे, जमादार निवृत्ती बडे आदींनी भेट दिली.