शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी चौथी वर्गाची, भरविला पाचवीचा वर्ग; चुकीचे 'धडे' देण्याऱ्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 12:11 IST

विद्यार्थ्यास बनावट गुणपत्रिका, निर्गमउतारा व टीसी दिल्याने उघडकीस आला प्रकार

- इस्माईल जहागिरदारवसमत: शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद संस्थेच्या सानिया उर्दू  प्राथमिक शाळेस चौथी वर्गापर्यंतच मान्यता असताना तेथे चक्क पाचवीचे वर्ग भरव प्रवेश देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवरून जिल्हा सत्र न्यायालयाने सदरील संस्थाचालकासह इतरांवर गुन्हा दाखल करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वसमत शहरातील सानिया उर्दू प्राथमिक शाळेस इय्यता १ ते ४ वर्गाची  मान्यता असताना येथे इय्यता ५ वीचा वर्ग चालवीला. त्यावर्गातील एका विद्यार्थ्यास शाळेने बनावट गुणपत्रिका, निर्गमउतारा व टीसी देऊन ६ वी वर्गात प्रवेश पात्र असल्याचा शेरा दिला. मात्र, याबाबत पालक म.सलिम म.रहीम यांना संशय आला. त्यांनी शिक्षण विभागाकडे पडताळणी केली असता सत्यता समोर आली. यानंतर त्यांनी शाळेच्या चौकशीची मागणी केली होती. २०१६ मध्ये फौजदारी न्यायालय प्रथमवर्ग वसमत येथे तक्रारदार म. सलिम यांनी वकीला मार्फत याचिका दाखल केली होती. 

यावर १५ एप्रिल रोजी न्यायधिश यू. सी. देशमुख यांनी दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर १५६(३) नुसार संस्थाचालक अमजद हुसेन पठाण रा हिंगोली, शाहीन बेगम अब्दुल गफार रा वसमत, जाकेरा बेगम जियाऊलहक रा हिंगोली,शेख इब्राहिम चॉंद रा वसमत,शहेनाज बेगम सत्तार खॉ रा वसमत,सय्यद रहिम सय्यद सादेख रा वसमत,यांची चौकशी करत गुन्हा दाखल करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे,तक्रारदार म.सलिम यांच्या तर्फे अँड शेख आयाज, अँड शेख फयाज यांनी युक्तिवाद केला होता. २८ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाचे पत्र प्राप्त होताच म.सलिम म.रहिम यांच्या फिर्यादीवरून संस्था चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEducationशिक्षणHingoliहिंगोली