वैधमापन विभागाचा १0३ व्यापार्यांना दंड
By Admin | Updated: December 5, 2014 15:22 IST2014-12-05T15:22:03+5:302014-12-05T15:22:03+5:30
/वैधमापन /विभागाने व्यापार्यांकडील मोजमापांच्या फेरतपासणीत जिल्ह्यातील १0३ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात केलेल्या या कारवाईत ३१ हजार २00 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

वैधमापन विभागाचा १0३ व्यापार्यांना दंड
हिंगोली : वजनमापे फेरतपासणीत कारवाईं |
हिंगोली : /वैधमापन /विभागाने व्यापार्यांकडील मोजमापांच्या फेरतपासणीत जिल्ह्यातील १0३ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात केलेल्या या कारवाईत ३१ हजार २00 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला. ■ जिल्ह्यात सेनगाव, औंढा नागनाथ, जवळाबाजार, सिरसम, कनेरगावनाका, नर्सी नामदेव, गोरेगाव आदी ठिकाणी वजनमापे तपासणीसाठी कॅम्प लावण्यात आला होता. त्यासाठी व्यापार्यांना नोटीसाही पाठविण्यात आल्या. तरीही व्यापार्यांनी वजनकाट्यांची तपासणी केली नसल्याची माहिती हिंगोली येथील वैधमापन निरीक्षक ब. दे. पायघन यांनी सांगितले. |