बालरोग तज्ञ डॉ.खराटे पुन्हा वसमत उपजिल्हा रूग्णालयात रूजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:52 IST2019-01-12T00:52:24+5:302019-01-12T00:52:48+5:30
येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत खराटे यांची पूर्णा येथे झालेली प्रतिनियुक्ती महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. त्यामुळे त्यांची पुन्हा वसमत उपजिल्हा रूग्णालयात नियुक्ती झाली आहे. डॉ. खराटे यांच्या पुन्हा नियुक्ती झाल्याने वसमतच्या बालरूग्णांची गैरसोय थांबणार आहे.

बालरोग तज्ञ डॉ.खराटे पुन्हा वसमत उपजिल्हा रूग्णालयात रूजू
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत खराटे यांची पूर्णा येथे झालेली प्रतिनियुक्ती महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. त्यामुळे त्यांची पुन्हा वसमत उपजिल्हा रूग्णालयात नियुक्ती झाली आहे. डॉ. खराटे यांच्या पुन्हा नियुक्ती झाल्याने वसमतच्या बालरूग्णांची गैरसोय थांबणार आहे.
वसमत तालुक्यातील कौठा येथील तरूण कार्यकर्ता अपघातात ठार झाला होता. मयताचे प्रेत रात्री शवागारात ठेवल्यानंतर प्रेताचे लचके उंदराने तोडल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करून तिव्र भावना व्यक्त केल्या होत्या. शासनाने आंदोलनाची दखल घेतली व प्रभारी वैद्यकीय अधिक्षक पदाचा प्रभार सांभाळणाऱ्या बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत खराटे यांची बदली पूर्णा येथे केली होती. मात्र बदलीनंतर वसमत अन्य बालरोग तज्ञ नियुक्त करण्यात आला नाही. परिणामी वसमतमधील बाल रूग्ण व पालकांची ससेहोलपट सुरू झाली. व गोरगरीब बालरूग्णांना खासगी दवाखान्यातच जाण्याशिवाय मार्ग राहीला नव्हता.
दरम्यान, बदली विरोधात डॉ. खराटे यांनी ‘मॅट’ मध्ये धाव घेतली. मॅटने त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर शुक्रवारी डॉ. प्रशांत खराटे पुन्हा वसमतच्या उपजिल्हा रूग्णालयात रूजू झाले आहेत. आता पुन्हा डॉ. खराटे वसमतमध्ये रूजू झाले. यासंदर्भात डॉ. खराटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रूग्णालयात घडलेली ती घटना दुख:द होती, त्याचा मलाही अत्यंत खेद आहे. दुखदायकच त्या काळात माझ्याकडे वैद्यकीय अधिक्षक पदाचा प्रभार होता. त्यामुळे माझ्या विरोधात रोष व्यक्त होणे स्वाभिविक होते. आता पुन्हा मला वसमतकरांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आगामी काळात रूग्णालयात रूग्णांची सेवा करण्याचा माझा प्रयत्न राहील, गोरगरीब रूग्ण, व बालकांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.