दरवर्षी शासनाकडून शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र शाळा उघडून अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होत नाहीत. विशेष म्हणजे आता पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाची जबाबदारी दिली आहे. ...
शॉक लागून मयत झालेले माधव चांदणे यांचे प्रेत नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे ८ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेवेमुळे मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी डायलिसिस करण्यासाठी पर जिल्ह्यात धाव घ्यावी लागत होती. यामध्ये रुग्णही दगावण्याची शक्यता होती. मात्र आता जिल्ह्यातच ...
शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांमध्ये आधी शिक्षण विभागाकडून योग्य छाननी झाली नसल्याचा परिणाम म्हणून की काय, नंतर विविध प्रमाणपत्रांवरून तक्रारी झाल्या. आता १0 जुलैला यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. ...
सभापती-उपसभापतींनी राजीनामे दिल्यामुळे हिंगोली पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव यांच्याकडे ईश्वर चिठ्ठीद्वारे देण्यात आला. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने पं.स.च्या नवीन सभापती निवडीसाठी १८ जुलै रोजी सभा बोलावली आह ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे बाजार चौक ते प्राथमिक आरोग्य केंद्रे व शाळेकडे जाणारा मुख्य कॅनलवरील सिमेंट रोड खचला असून रात्रीच्या वेळी अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. तीन वर्षांपूर्वी आमदार फंडातून हट्टा ग्रामपंचायतने हा रस्ता केला. अवघ्या तीन वर्ष ...
जिल्ह्यात सर्वदूर तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, औढा, वसमत सह केंद्रा बु., कडोळी, बाळापूर, नांदापूर, साटंबा, बासंबा, गोरेगाव, आखाडा बाळापूर, कडोळी, खुडज, वारंगा फाटा, जवळा ...
येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी सात दिवसांपासून राजीनामे दिले असून ही पदे रिक्त झाली आहेत. तर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे प्रभारी सभापती निवडीसाठी जि.प.त शनिवारी बैठक होणार आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मुनीर पटेल यांची फेरनिवड झाली असून कार्याध्यक्षपदी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हाध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. ...