हिंगोली शहरातील मनीष एजन्सीच्या गाडीचा पाठलाग करुन चालकाच्या गळ्याला चाकू लावून ९७ हजारांची बॅग पळवल्याची घटना ३१ जानेवारी रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. ...
पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेसह इतर अधिकाऱ्यांची पथके स्थापन करून हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याचा चंग बांधला होता. त्यातच फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांनाही धडा शिकविण्यास सांगितले होते. मात्र यानंतर उलट बेशिस्त वाहतूक बोकाळली असून एका दिवसात गुंडाळले ...
जिल्हा परिषदेत अग्रीम रक्कमेच्या प्रश्नावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर आता विविध विभागाच्या प्रमुखांची धांदल उडाली आहे. ...
मागील अनेक महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन रखडले होते. अखेर उशिराने का होईना सात महिन्यांचे मानधन मदतनिसांना वाटप करण्यात आले आहे. मानधन रखडल्याबाबत लोकमत ने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना मिळालेल्या तांदळाच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने पुन्हा मागितला असून रिकामे पोते शोधण्यासाठी मुख्याध्यापकांची चांगलीच दमछाक होणार आहे. ...
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने भारतातील बालविवाह घटनांसदंर्भात नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. बालविवाहाच्या सर्वांत जास्त घटना घडलेल्या देशातील ७० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल १६ जिल्हे असल्याची नामुष्की ओढवली आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे करपेवाडी येथील नाभिक समाजाच्या मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी बंद पाळून प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. ...