जिल्ह्यात पाच आमदारांना ९.५0 कोटी रुपयांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी मिळाला असून यापूर्वी समर्पित केलेले ५.१५ कोटीही प्राप्त झाले आहेत. एकूण १४.६५ कोटी रुपये उपलब्ध असून जुन्या कामांसाठी ६.८७ कोटी लागणार आहेत. यंदा १८६ कामांना प्रशासकीय मान ...
वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी, परिसरातील सर्वच जलस्त्रोत आटले आहेत. येथील शेतकरी राजू शेख हे हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहेत. ...
निराधार योजनेची लाभ घेण्यासाठी काढलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचे तपासात आढळून आल्याने १३ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली. ...
: गतवर्षी हुतात्मा स्मारकांच्या डागडुजीचे काम केल्यानंतर यंदा दहा स्मारकांमध्ये एलसीडी प्रोजेक्टर, खुर्च्या इ. साहित्यासाठी दहा लाखांचा निधी शासनाने दिला आहे. लवकरच या साहित्याचा पुरवठा होणार आहे. ...
राज्यातील नगर पालिका नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात १ जानेवारी रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. १ जानेवारी रोजी शासनासोबत झालेल्या तडजोडीनुसार त्यातील प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील १५०० रोजंदारी कर्मचारी कायम करण्याचा निर्ण ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर ८ जानेवारी रोजी विविध संघटना व युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. देशव्यापी संपात सहभागी संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले. ...
नांदेड येथून हिंगोली, अकोला मार्गे वाराणसी-गोरखपूर रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे बोर्डाचे सदस्य खा. राजीव सातव यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...
जे शासकीय अधिकारी-कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
येथील महावितरण कार्यालयासमोर ७ जानेवारी रोजी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी एकदिवशीय संप पुकारण्यात आला. संपात जिल्हाभरातील ५०० च्या वर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. ...