५६५ पैकी २१८ ग्रां.प.त हाताला काम, रोजगार हमी योजनेवर ५२ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST2021-03-10T04:30:34+5:302021-03-10T04:30:34+5:30

हिंगोली :कोरोनामुळे अनेक क्षेत्रातील रोजगार हातचा गेला असताना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेने मजुरांना तारले. जिल्ह्यात २१८ गावांत रोजगार ...

Out of 565, 218 G.P.T. manual labor, 52 thousand laborers on employment guarantee scheme | ५६५ पैकी २१८ ग्रां.प.त हाताला काम, रोजगार हमी योजनेवर ५२ हजार मजूर

५६५ पैकी २१८ ग्रां.प.त हाताला काम, रोजगार हमी योजनेवर ५२ हजार मजूर

हिंगोली :कोरोनामुळे अनेक क्षेत्रातील रोजगार हातचा गेला असताना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेने मजुरांना तारले. जिल्ह्यात २१८ गावांत रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून दिले असून यातून तब्बल ५२ हजार ९८१ मजुरांना काम मिळाले आहे. ऐन कोरोना काळात हाताला कामे मिळाल्याने मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यात काही अंशी यश आल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रूग्णसंख्येेला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला. मोठ्या शहरात कामानिमित्त गेलेले मजूर गावाकडे परत आले. मात्र रोजगाराचा प्रश्न तसाच होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावातच कामे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे मंजूर करून रोजगार उपलब्ध करून दिला. २०२०-२१ या काळात २१८ गावांत ७०३ कामे सुरू करण्यात आली. यातून ३० हजार ६०३ कार्डावरील ५२ हजार ९८१ मजुरांच्या हाताला काम मिळाले. सध्या सिंचन विहीर, घरकुले, रोपवाटीका आदी कामे सुरू असून या कामातून रोजगार मिळाल्याने मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यात प्रशासनाला काही अंशी यश आल्याचे दिसून येत आहे.

सर्वाधिक कमी रोजगार कळमनुरी तालुक्यात

जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतीमध्ये ७०३ कामे सुरू असून यातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात सर्वाधिक कामे कळमनुरी तालुक्यातील सर्वाधिक ५५ ग्रां.प.मध्ये कामे सुरू असली तरी रोजगार मात्र सर्वात कमी उपलब्ध होत आहे. कळमनुरी तालुक्यात ५ हजार ८६३ जॉबकार्डवरील ९ हजार ८५२ मजुरांना कामे मिळाली आहेत. तर औंढा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ३० ग्रां.प.मध्ये कामे सुरू असली तरी यातून सर्वाधिक म्हणजे ११ हजार २१० मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहेत.

तालुकानिहाय स्थिती

तालुका - ग्रामपंचायती - कामे सुरू असलेल्या ग्रां.प.

औंढा ना. १०२ ३०

वसमत ११९ ५२

हिंगोली १११ ४५

कळमनुरी १२५ ५५

सेनगाव १०८ ३६

रोहयोचा आराखडा

जिल्ह्याती एकूण जॉबकार्डधारक - १७२९०८

सध्या सुरू असलेली रोहयोची कामे - ७०३

प्रतिक्रीया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने सध्या तरी रोजगाराचा प्रश्न काही अंशी मिटण्यास मदत झाली आहे.

- बाबूराव करंडे, रोहयो कामगार

शेतातील पिके हातची गेली. तसेच लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न होता. आता गावात घरकुल, सिंचन विहीरींच्या माध्यमातून रोहयोची कामे सुरू आहेत. आता हाताला कामे उपलब्ध करून दिल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.

- परमेश्वर कदम, रोहयो कामगार

Web Title: Out of 565, 218 G.P.T. manual labor, 52 thousand laborers on employment guarantee scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.