सतराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:38 IST2019-02-11T00:32:30+5:302019-02-11T00:38:42+5:30
शांतीनगर आंधरवाडी येथील जेतवन बुद्ध विहार येथे १२ फेबु्रवारी रोजी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जेतवन बौध्द प्रशिक्षण केंद्र शांतीनगरतर्फे सतराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सतराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शांतीनगर आंधरवाडी येथील जेतवन बुद्ध विहार येथे १२ फेबु्रवारी रोजी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जेतवन बौध्द प्रशिक्षण केंद्र शांतीनगरतर्फे सतराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्म परिषदेचे अध्यक्ष पू. भिक्खू धम्मसेवक महाथेरो, पू. भदन्त प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो, पू. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, पू. भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, पू. भिक्खू पय्यारत्न थेरो, पू. भिक्खू पय्याबोधी आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८.३० वाजता धम्म ध्वजारोहण, ११ वाजता भिक्खू संघास भोजनदान, दुपारी २ वाजता धम्मपरिषदेचे उद्घाटन तसेच दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत भिक्खू संघाच्या वतीने धम्मदेसना दिली जाणार आहे. धम्म परिषदेस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धम्म परिषदेचे मुख्य संयोजक पू. भिक्खू काश्यप महाथेरो, सह संयोजक पू. भिक्खू धम्मशील, पू. भिक्खू पय्यानंद आदींनी केले.
यावेळी पू.भिक्खू शरणानंद महाथेरो, पू.भिक्खू धम्मदीप महाथेरो, प्रा.डॉ.सत्यपाल महाथेरो, यश काश्यपायन महाथेरो, काश्यप थेरो, विनयबोधी प्रियथेरो, करूणानंद थेरो, महाविरो थेरो, मुदितानंद थेरो, प्रज्ञापाल, शीलरत्न, सुभूती, बोधिशील, संघपाल, संघप्रिय, रेवतबोधी आदी धम्मदेसना देणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत बौध्द धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे.