गैरहजर कर्मचाऱ्यास नोटीस बजावण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:42+5:302021-01-08T05:37:42+5:30

माळी यांनी पं. स. कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीबाबत आढावा घेतला. या आढाव्यात त्यांना एक लिपिक गैरहजर असल्याचे आढळून आले. ...

Order to serve notice to the absent employee | गैरहजर कर्मचाऱ्यास नोटीस बजावण्याचे आदेश

गैरहजर कर्मचाऱ्यास नोटीस बजावण्याचे आदेश

माळी यांनी पं. स. कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीबाबत आढावा घेतला. या आढाव्यात त्यांना एक लिपिक गैरहजर असल्याचे आढळून आले. या कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच पंचायत समिती आवारात स्वच्छता मोहीम राबवून स्वत: व अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत स्वच्छता केली. तसेच दर आठ दिवसाला पंचायत समिती परिसरात स्वच्छता करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. पं. स. आवारात केलेल्या घनदाट वृक्ष लागवडीची पाहणी पाहणी करून त्यांनी याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिकारी राधेशाम परांडकर, कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत घवाड, व्ही. एस. पाईकराव, राजेश बाहेती, शेख सलीम, मार्कड, शितळे, रणवीर, गंगाधर शेळके, प्रमोद देशपांडे, चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Order to serve notice to the absent employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.