शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

तंटामुक्त समित्या उरल्या केवळ कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 7:41 PM

तत्कालीन गृहराज्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून तंटामुक्ती अभियान राज्यभर सुरू केले होते.

ठळक मुद्देप्रकरणे थेट पोलीस ठाण्यात   अनेक गावांत समित्या मृतावस्थेत

- गजानन वाखरकर औंढा नागनाथ : गावागावात छोट्या-मोठ्या वादानंतर उद्भवणारे तंटे गाव पातळीवरच मिटविण्यासाठी राज्यभर राबविलेली तंटामुक्ती मोहीम थंड पडल्याचे जाणवत आहे. या समित्या आता कागदोपत्रीच शिल्लक उरल्या आहेत. त्यामुळे गावात मिटणारे तंटे आता थेट पोलिस ठाण्यात पोहचत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनावरही ताण पडत असल्याचे  चित्र आहे. औंढा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या ६० समित्या आता नावालाच उरल्या आहेत. 

तत्कालीन गृहराज्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून तंटामुक्ती अभियान राज्यभर सुरू केले होते. गावातील छोटे-मोठे तंटे पोलीस ठाण्यात जाण्याअगोदरच मिटावीत. तसेच गावपातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम ठेवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. यासाठी ग्रामपातळीवर तंटामुक्त समित्या गठीत करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची निवड केली होती. त्यानंतर या मोहीमेला गावागावातून चांगला प्रतिसाद येत गेला. गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने पोलिसांवरचा ताण कमी होऊन जातीय सलोखा राखला जाऊ लागला. एवढेच नव्हे, तर परिसरातील गावागावांमध्ये तंटामुक्त गाव होण्यासाठी स्पर्धा लागली होती. त्यातून अनेक गावांना या कामगिरीतुन लाखो रुपयांची पारितोषिके दिली आहेत. मात्र सध्या हे अभियान थंड बस्त्यात दिसून येत आहे. सरकार बदलल्यानंतर इतर योजना जशा थंड बस्त्यात जातात, त्याप्रमाणेच तंटामुक्त योजनेची अवस्था झाल्याचे दिसून येते. विद्यमान सरकारने मागील पाच वर्षाच्या काळात या अभियानाला एकदाही प्रोत्साहन दिलेले दिसून आले नाही. फक्त ज्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांचा  कार्यकाळ संपला त्यांनाच पुन्हा मुदती वाढून देण्यात आल्याचे चित्र आहे. 

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानामुळे गावातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र यायचे. सर्वांचे सण, उत्सव एकत्र साजरे करायचे. सार्वजनिक कामांना अधिक प्राधान्य दिले जायचे; परंतु आज या अभियानाचा सर्वांनाच विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. औंढा नागनाथ पोलीस ठाण्यांतर्गत ७९ गावांचा समावेश आहे. त्यापैकी ग्रुप ग्रामपंचायत धरून ६० गावांमध्ये तंटामुक्त समित्या असून ज्या गावांमधील समित्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, अशा तंटामुक्त समित्यांना पुन्हा मुदतवाढ दिल्याचे पोनि वैजनाथ मुंढे यांनी सांगितले आहे. 

चांगला प्रतिसाद होता पोलिसांवर ताण वाढलातत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात ही योजना सुरू केली. याला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता.अनेक गावांनी या योजनेंतर्गत महाराष्ट्र  शासनाचे पुरस्कारही पटकावले आहेत. परंतु विद्यमान सरकारने या योजनेला प्रोत्साहन न दिल्याने ही योजना आता थंड असल्याचे दिसून येत आहे. या योजनेमुळे थोड्याफार प्रमाणात पोलिसांचा ताण कमी झाल्याचे दिसून आले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी