जिल्ह्यात केवळ १३१ रुग्णालयांचीच नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:33+5:302021-01-08T05:37:33+5:30

हिंगोली : अनेक रुग्णालयांत रुग्णांना २४ तास निगराणीखाली ठेवण्याची सोय असतानाही बाॅम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत नोंदणी करण्यास टाळाटाळ दिसून येत ...

Only 131 hospitals are registered in the district | जिल्ह्यात केवळ १३१ रुग्णालयांचीच नोंदणी

जिल्ह्यात केवळ १३१ रुग्णालयांचीच नोंदणी

हिंगोली : अनेक रुग्णालयांत रुग्णांना २४ तास निगराणीखाली ठेवण्याची सोय असतानाही बाॅम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत नोंदणी करण्यास टाळाटाळ दिसून येत आहे. जिल्ह्यातील केवळ १३१ रुग्णालयांनी अशी नोेंदणी केली आहे. जुजबी शुल्क असताना ही परिस्थिती असल्याचे आश्चर्य आहे.

शासनाकडूनही या ॲक्टअंतर्गत नोंदणी असलेल्यांचीच नोंद घेतली जाते. कोरोनाची लस देताना त्याचा अनुभव आला. मात्र, तरीही जिल्ह्यात काही ठिकाणी १ ते १० बेड असूनही त्याची नोंदणी केली जात नसल्याचा प्रकार आहे. जेथे फक्त रुग्ण तपासणी होते. २४ तासांसाठी दाखल केले जात नाहीत, अशांना नोंदणीची गरज नाही.

वर्षभरात केवळ ११ रुग्णालयांची नोंदणी

दिवसेंदिवस रुग्णांचे नातेवाईक सतर्क होत आहेत. त्यामुळे नोंदणी नसलेल्या रुग्णालयात काही अनर्थ घडला तर त्याची अडचण होवू शकते. मागील वर्षभरात केवळ ११ रुग्णालयांनीच नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणी केली. त्यामुळे संख्या १३१ वर गेली.

...तर रुग्णालय सील, दंडही होऊ शकतो

जर एखाद्या ठिकाणी नोंदणी न करताच रुग्ण दाखल करून घेण्याचा प्रकार आढळला तर रुग्णालय सील करणे, दंड अथवा गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते. सेनगावात रुग्ण दाखल करणारे एकही रुग्णालय नसल्याचे दिसत आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

हिंगोली ७०

वसमत ३०

कळमनुरी २०

सेनगाव ००

औेढा ११

एकूण १३१

नर्सिंग ॲक्टमध्ये नाेंदणी करण्यास १ ते १० बेडपर्यंत ग्रामीणला एक ते दीड तर शहरी रुग्णालयांना दोन ते अडीच हजारांपर्यंत शुल्क लागतो. बेडच्या संख्येनुसार शुल्क वाढत जाते.

Web Title: Only 131 hospitals are registered in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.