रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष देऊन एकास दहा लाखास फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 14:15 IST2021-05-14T14:09:07+5:302021-05-14T14:15:04+5:30
बँक ऑफ इंडीया व नांदेड मर्चंट बँक शाखा वसमत या खात्यावर दहा लाख रूपये भरले.

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष देऊन एकास दहा लाखास फसवले
हिंगोली : रेल्वे खात्यात नोकरी लावतो असे सांगून एकास दहा लाख रूपयांनी फसविल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात उत्तरप्रदेशतील एकावर गुन्हा नोंद झाला आहे.
वसमत तालुक्यातील शिवपुरी येथील पंडीत सुधाकर ढवळे (वय २८) यांची संतोष बनवारीलाल सरोज (रा. बोडेपूर. जि. जोनपूर, उत्तर प्रदेश) याच्यासोबत ओळख झाली होती. रेल्वे खात्यात नोकरी लावून देतो, मात्र यासाठी दहा लाख रूपये लागतील असे अमिष संतोष सरोज याने पंडीत ढवळे यांना दाखविले. नोकरी लागत असल्याने पंडीत ढवळे यांनी १९ जुलै २०१८ ते ३१ जुलै २०१९ या काळात संतोष सरोज याच्या बँक ऑफ इंडीया व नांदेड मर्चंट बँक शाखा वसमत या खात्यावर दहा लाख रूपये भरले. मात्र, याप्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर १३ मे रोजी रात्री याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात पंडीत ढवळे यांच्या फिर्यादीवरून संतोष सरोज याच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला. पुढील तपास सपोनि. पंढरीनाथ बोधनापोड करीत आहेत.