शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: October 28, 2022 19:08 IST

यावेळी हजारो शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ५० खोके एकदम ओके आदी घोषणाही देण्यात आल्या.

हिंगोली : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी या व  इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने २८ ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ५० खोके एकदम ओके आदी घोषणाही देण्यात आल्या.

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी,  शिक्षण व उद्योगासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना सिविल स्कोरची अट लावू नये, पीकविमा द्यावा, शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, जिल्हा परिषद भरतीला मिळालेले स्टे उठवावा, तत्काळ पोलीस व सैन्य भरती घ्यावी, यासह इतर मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला मोर्चा महात्मा गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी आमदार नवघरे, विधान परिषद सदस्या सातव, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. त्यांनी केंद्र, राज्य शासनाच्या धोरणाविरूद्ध सडकून टिका केली. त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

आंदोलक-पोलिसांत झटापट कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरही पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आला असता आंदोलकांनी प्रवेशद्वार लोटत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली.  यावेळी पोलिसांना दंडूका उगारावा लागला. पोलीस व आमदार नवघरे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलक शांत झाले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीdroughtदुष्काळ