धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:06 IST2018-10-07T00:05:58+5:302018-10-07T00:06:17+5:30

वसमत तालुक्यातील हट्टा येथे काही समाजकंटकांनी महापुरूषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी ६ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Offense of hurt by religious sentiments | धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा

धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे काही समाजकंटकांनी महापुरूषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी ६ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हट्टा येथे काही अज्ञात आरोपींनी ५ आॅक्टोबर ते ६ आॅक्टोबर दरम्यान महापुरूषाच्या पुतळ्यांची विटंबना केली. धार्मिक भावना दुखावल्याने बौध्द समाजबांधवांनी याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तातेराव खाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरूद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. टी. बाचेवाड करीत आहेत.

Web Title:  Offense of hurt by religious sentiments