शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ओडिशा संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:06 AM

मागील सात दिवसांपासून हिंगोली येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सुरू असलेल्या स्व. बलभद्रजी कयाल राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रविवारी ओडिशाचा राऊरकेला सेल संघ विरूध्द अर्टीलरी सेंटर नाशिक यांच्यात झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील सात दिवसांपासून हिंगोली येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सुरू असलेल्या स्व. बलभद्रजी कयाल राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रविवारी ओडिशाचा राऊरकेला सेल संघ विरूध्द अर्टीलरी सेंटर नाशिक यांच्यात झाला. दोन्ही संघांनी चुरशीचा सामना खेळला मात्र राऊरकेला सेल संघाने नाशिकच्या संघाला २-१ ने पराभूत करीत हॉकी स्पधेर्चे विजेतेपद पटकाविले. उपविजेता संघाचा मान नाशिकच्या संघाला मिळाला आहे.रविवारी उपांत्य फेरीचे सामने झाले. पहिला सामना अर्टीलरी सेंटर नाशिक विरूध्द आरडीटी अनंतापूर यांच्यामध्ये झाला. या सामान्यात नाशिक संघाने अनंतापूरचा २-१ ने पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्याचा सामनावीर म्हणून अनंतापूर संघाचा पी.थरून ठरला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ए.ओ.सी.सिकंदराबाद विरूद्ध सेल राऊरकेला यांच्यात लढत झाली. या सामन्यात राऊरकेला संघाने ए.ओ.सी.सिकंदराबादला ३-१ ने पराभूत करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तिसरा सामना तृतीय पारितोषिकासाठी आर.डी.टी. अनंतपूर आणि ए.ओ.सी. सिकंदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात सिकंदराबाद संघाने अनंतापूर संघाचा २-० ने पराभव केला. या सामन्याचा सामनावीर व्यंकटेश यास ज्येष्ठ तुकाराम झाडे यांच्या हस्ते पारितोषिक दिले. अंतिम सामना राऊरकेला सेल विरूद्ध अर्टीलरी सेंटर नाशिक यांच्यामध्ये अटीतटीचा झाला. या सामन्यात राऊरकेलाच्या संघाने नाशिकच्या संघावर अनेकवेळा जोरदार चढाई केली. प्रत्युत्तरात नाशिकच्या संघानेही राऊरकेला संघावर आक्रमण केले. या सामन्यामध्ये दोन्ही संघात चांगलीच चुरस पहायला मिळाली. परंतु, राऊरकेला सेलच्या संघाने नाशिकच्या संघाला २-१ ने पराभूत करीत राष्ट्रीय हॉकी स्पधेर्चे विजेतेपद पटकाविले.हिंगोली शहरात हॉकी स्पर्धा दसरा महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. परंतू दसरा महोत्सव शासनाच्या ताब्यात गेल्यापासुन हा खेळ दुरापास्त झाला. काही वषार्पुर्वी स्व.बाबूलाल राठोड यांच्या नावाने अनेकवर्ष या स्पर्धा घेण्यात आल्या. शहरवासीयांच्या आवडीचा हा खेळ असल्याने संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर हॉकीचे सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. अनेक वषार्नंतर यावर्षी प्रथमच कयाल, राठोडसह इतर मान्यवरांच्या पुढाकाराने हॉकीचे सामने सुरू झाले. मंगळवारी झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर तोबा गर्दी जमली होती. अंतिम सामन्यानंतर हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र कयाल, सुभाष तापडिया, कमलकिशोर काबरा, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, राठोड यांच्या हस्ते विजेता संघ राऊरकेला प्रथम पारितोषिक ३१ हजार रूपये व ट्रॉफी तर उपविजेता नाशिक संघाला २१ हजार आणि ट्रॉफी प्रदान केली. तृतीय आलेला सिकंदराबाद संघाला १ हजार व स्मृतिचिन्ह प्रदान केले. यशस्वीतेसाठी अ‍ॅम्येच्युअर जिल्हा हॉकी असोसिएशन, एमबीआर गु्रपच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHockeyहॉकी