महिला रुग्णांसाठी आता स्वतंत्र कोरोना केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST2021-03-17T04:30:39+5:302021-03-17T04:30:39+5:30
महिला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीही लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे. यात कडती उपकेंद्रातील डॉ. वैष्णवी कापसे, ...

महिला रुग्णांसाठी आता स्वतंत्र कोरोना केअर सेंटर
महिला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीही लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे. यात कडती उपकेंद्रातील डॉ. वैष्णवी कापसे, डिग्रस कऱ्हाळेच्या डॉ. संगीता टार्फे, भटसावंगीच्या डॉ. रूपाली मकासरे, जांभरुण तांडा येथील मंजूषा कऱ्हाळे, राहोली येथील डाॅ. सय्यद आलिया समरीन, लोहगावच्या डॉ. शांता कऱ्हाळे यांचा समावेश आहे. १६ ते २२ मार्च या कालावधीत या डॉक्टर या ठिकाणी सेवा बजावणार आहेत. यानंतर पुन्हा वेगळ्या डॉक्टरांचे पथक नेमले जाणार आहे. यात दिरंगाई केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
अनेक जण कुटुंबाची काळजी वाटत असल्याने चाचणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. आता महिलांसाठी स्वतंत्र कोरोना सेंटर उभारण्यात आल्याने यात बदल होण्याची शक्यता आहे.