आता लक्ष सरपंच-उपसरपंच निवडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:28+5:302021-02-05T07:54:28+5:30

वसमत तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची व सर्वात मोठी कुरुंदा ग्रामपंचायत मानल्या जाते. त्यामुळे सर्वच पक्षाचे नेते कुरुंदा ग्रामपंचायतवर वर्चस्वसाठी ...

Now the focus is on Sarpanch-Deputy Sarpanch selection | आता लक्ष सरपंच-उपसरपंच निवडीकडे

आता लक्ष सरपंच-उपसरपंच निवडीकडे

वसमत तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची व सर्वात मोठी कुरुंदा ग्रामपंचायत मानल्या जाते. त्यामुळे सर्वच पक्षाचे नेते कुरुंदा ग्रामपंचायतवर वर्चस्वसाठी शक्ती पणाला लावत असतात. परंतु ऐनवेळी अचानक झालेल्या राजकीय घडामोडीतून १७ पैकी १६ जागा बिनविरोध झाल्या. त्यात एकहाती सत्ता वसमत बाजार समितीचे सभापती राजेश पाटील इंगोले यांच्याकडे आली. एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीतही त्यांनी यश संपादन केले. आगोदर ओबीसी प्रवर्गाकरिता सरपंचपद राखीव होते. आता नव्याने निघालेल्या आरक्षणात सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे. २० वर्षांनंतर सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे.

सरपंचपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून सभापती राजेश पाटील इंगोले यांच्याकडे पाहिल्या जाते तर उपसरपंच पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे दिसते. सरपंच-उपसरपंच निवड ज्येष्ठ नेते निरंजन पाटील इंगोले यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

Web Title: Now the focus is on Sarpanch-Deputy Sarpanch selection