शाळेच्या वेळेबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:13+5:302021-02-05T07:54:13+5:30

१० नोव्हेंबर, २०२०च्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील इयत्ता ९ ते बारावीच्या शाळा टप्प्याटप्प्याने २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरू झालेल्या आहेत, तसेच ...

Notice to Group Education Officer regarding school hours | शाळेच्या वेळेबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

शाळेच्या वेळेबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

१० नोव्हेंबर, २०२०च्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील इयत्ता ९ ते बारावीच्या शाळा टप्प्याटप्प्याने २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरू झालेल्या आहेत, तसेच ५ ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी कमाल तीन ते चार तास उपस्थित ठेवावे, तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांनी शाळेत नियमित पूर्णवेळ उपस्थित राहावे. इयत्ता पहिली ते चौथी वर्ग शिक्षकांनी ५० टक्के शाळेत उपस्थित राहावे. आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व मुख्याध्यापकांना शाळा स्तरावरील सर्व शिक्षक शाळेच्या वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहतील. काही कारणास्तव त्यांना रजेची आवश्यकता असल्यास पूर्व परवानगीने रजेवर राहतील, तसेच अनुपस्थित असलेल्या शिक्षकांची, तसेच दीर्घ रजेवर गेलेल्या शिक्षकांची संबंधित शाळेकडून अहवाल घेऊन प्राप्त अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात यावा. शिक्षकांची उपस्थिती व विद्यार्थ्यांची गुणवत्ता आपण व आपल्या अधिनस्त असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी वारंवार शाळेला भेटी देऊन भेटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात यावा. या कामी विलंब अथवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे पत्र काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळेच्या वेळा बदलाबाबत सूचना दिलेल्या आहेत.

Web Title: Notice to Group Education Officer regarding school hours