पाच वर्षांपूर्वीच न. प. ने केला १३ वाहनांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST2021-03-04T04:56:42+5:302021-03-04T04:56:42+5:30

हिंगोली : जुन्या वाहनांचे आयुष्यमान लक्षात घेऊन नगरपरिषदेने १० जानेवारी २०१७ मध्ये १३ वाहनांचा लिलाव केला आहे. सद्य:स्थितीत ...

Not five years ago. W. Auctioned 13 vehicles | पाच वर्षांपूर्वीच न. प. ने केला १३ वाहनांचा लिलाव

पाच वर्षांपूर्वीच न. प. ने केला १३ वाहनांचा लिलाव

हिंगोली : जुन्या वाहनांचे आयुष्यमान लक्षात घेऊन नगरपरिषदेने १० जानेवारी २०१७ मध्ये १३ वाहनांचा लिलाव केला आहे. सद्य:स्थितीत नगरपरिषदेकडे कार्यरत असलेली १९ वाहने आहेत.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने १५ वर्षांपुढील सरकारी, खासगी वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. आजमितीस तरी हिंगोली नगरपरिषदेकडे १५ वर्षांपुढील वाहने अस्तित्वात नाहीत. जी काही १९ वाहने आहेत ती सध्या कार्यरत असून सुस्थितीत आहेत. त्यामध्ये १४ गाड्या या शहरातील कचरा भरण्यासाठी, दोन गाड्या या अग्निशमन विभागात कार्यरत आहेत, मालवाहतुकीसाठी २ टिप्पर तर इतर कामांसाठी ट्रॅक्टर १ असे एकूण वाहने कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया

सद्य:स्थितीत नगरपरिषदेकडे जुने असे एकही वाहन नाही. जी काही वाहने आहेत ती चालू स्थितीत आहेत. नवीन वाहनांचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अजून तरी नवीन वाहने आलेली नाहीत. जुनी वाहने अपघाताला कारणीभूत ठरतात म्हणून २०१७ मध्ये १३ वाहनांचा लिलाव नगरपरिषदेच्यावतीने शासनाच्या नियमांप्रमाणे केला गेला.

-डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, न. प. हिंगोली

वाहनांचा प्रकार आयुष्यमान

अग्निशमन वाहन (लहान)-१६ वर्ष

डम्पर प्लेझर (१)-११ वर्ष

व्हॅक्युमक्लीनर (१)-११ वर्ष

जेसीबी ट्रॉली (१)-८ वर्ष

ट्रॅक्टर हेड (२) -१३ वर्ष

ट्रॅक्टर ट्रॉली (३)-१३ वर्ष

ट्रॅक्टर ट्रॉली (२)-१४ वर्ष

ऑटो (१)-८ वर्ष

ऑटो (१)-६ वर्ष

ट्रॅक्टर हेड (१)-३५ वर्ष

Web Title: Not five years ago. W. Auctioned 13 vehicles