आधार कार्ड नाही; भिकाऱ्यांना लस कशी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST2021-03-08T04:28:16+5:302021-03-08T04:28:16+5:30

हिंगाेली शहरात अद्यापतरी भिकाऱ्यांचा सर्व्हे करण्यात आलेला नाही. जिल्ह्यात जवळपास १०० भिकारी तर शहरात ३५ भिकारी असल्याचे सांगण्यात ...

No Aadhaar card; How to vaccinate beggars? | आधार कार्ड नाही; भिकाऱ्यांना लस कशी देणार?

आधार कार्ड नाही; भिकाऱ्यांना लस कशी देणार?

हिंगाेली शहरात अद्यापतरी भिकाऱ्यांचा सर्व्हे करण्यात आलेला नाही. जिल्ह्यात जवळपास १०० भिकारी तर शहरात ३५ भिकारी असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षभरापासून कोरोना आजाराचे प्रमाण कमी-जास्त होत असल्यामुळे भिकारीपण दिसून येत नाहीत. आधार कार्डशिवाय लस मिळणार नसल्यामुळे त्यासंदर्भात लवकरच भिकाऱ्यांचा सर्व्हे केला जाईल, असे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

एका वर्षापूर्वी त्रयस्त संस्थेच्या वतीने शहरात बेघरांचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी सर्व्हेदरम्यान १२ जण बेघर असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर नगर परिषदेने २३ फेब्रुवारी रोजी २०२१ रोजी रात्रीच्या वेळेला सर्व्हे केला. यावेळी एक महिला व तीन पुरुष आढळून आले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी डाॅ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित मस्के, प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले.

बॉक्स

आधार कार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणार?

कोरोना लस सध्यातरी आधार कार्डची नोंदणी करूनच दिली जात आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांच्यासंदर्भात शासनाकडून जशा सूचना येतील तेव्हाच लस दिली जाईल. सध्या आधार कार्डची नोंदणी करूनच लस दिली जात आहे. शासनाने सूचना केल्यास भिकाऱ्यांनाही लस दिली जाईल, असे जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगितले.

बॉक्स

शहरात बेघरांचा सर्व्हे करण्यात आला मात्र भिकाऱ्यांचा सर्व्हे अद्यापही झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिकाऱ्यांचाही सर्व्हे लवकरच केला जाईल. आधार कार्डशिवाय लस नाही हे पाहून भिकाऱ्यांना लस कशी देता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

- डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, हिंगोली

Web Title: No Aadhaar card; How to vaccinate beggars?