शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

दुस-या दिवशीही उपोषण, आंदोलने सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:45 AM

जिल्ह्यात दुसºया दिवशीही २७ आॅगस्ट रोजी विविध सामाजिक संघटनांतर्फे आंदोलन व उपोषण सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून घोषणाबाजी केली. यावेळी परिसर आंदोलनांनी दुमदुमुन गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात दुस-या दिवशीही २७ आॅगस्ट रोजी विविध सामाजिक संघटनांतर्फे आंदोलन व उपोषण सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून घोषणाबाजी केली. यावेळी परिसर आंदोलनांनी दुमदुमुन गेला होता. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेत पोलीस प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले. प्रशासनास आंदोलन देऊन संबधितांवर कठोर कारवाई करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांची पुर्तता करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करातामिळनाडू येथील वेदरण्याम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली. यातील दोषींना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन २७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सकल बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आले आहे. वेदण्यारम या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबणा केली, त्याचा मेसेजही सोशल मीडियावर पसरत आहे. विटंबना घटनेमुळे सर्व समतावादी बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आज संतप्त सकल बहुजन समाजाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक करावी अशी मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन सादर करताना नितीन खिल्लारे, राहूल खिल्लारे, अक्षय इंगोले, आनंद खिल्लारे, आनंद खंदारे, दीपक सोनवणे, योगेश नरवाडे, विकी काशिदे, संघपाल रसाळ, अक्षय डाखोरे, जय घोडे, संजय उफाडे, मयूर नरवाडे, प्रकाश पठाडे, रमेश कांबळे, संदीप गवळी, सुमित खिल्लारे, सिद्धार्थ खंदारे, प्रफुल्ल सूर्यवंशी, यांच्यासह मोठ्या संख्येने युवक, पुरूष उपस्थित होते.हात निकामी झाल्याने कुटुंबावर उपासमारऔंढा तालुक्यातील नंदगाव येथे विद्युत व्यवस्थापक सुदाम राठोड हे डीपीवर काम करताना शॉक लागून त्यांचा हात निकामी झाला आहे. ही घटना २७ जुलै रोजी नंदगाव येथे घडली. महावितरणमधील अधिकारी व कर्मचाºयांच्या निष्काळजीपणामुळे डीपीवर काम करताना विद्युत प्रवाह केल्यानेच मला शॉक लागला व हात निकामी झाला, असे सुदाम राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर कार्यवाही करावी व नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. याबाबत गोरसेनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. घरातील कर्त्या व्यक्तीचा हात निकामी झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.विद्यार्थ्यांची फसवणूक करणाºयांवर गुन्हा दाखल करा; प्रशासनास निवेदनहिंगोली - विद्यार्थ्यांना खोटे आश्वासन देऊन फसवणूक करणाºयांवर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना २७ आॅगस्ट रोजी देण्यात आले.प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत हिंगोली येथे सुरू असलेल्या सृजन स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे डेटा एंट्री आॅपरेटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर असे विविध प्रकारचे कोर्सेस जवळपास पाच महिन्यांपासून सुरू आहेत. या कोर्ससाठी प्रतिविद्यार्थी सहा हजार रूपये प्रतिमहिना दिला जाईल व नोकरी लावून देण्याची हमी देत बँकेकडूनही कर्ज काढून दिले जाईल, असे आश्वासन आशिष वाजपेयी आणि राजेंद्र फड यांनी विद्यार्थ्यांना दिल्याचे विद्यार्थी सांगत होते.त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. मागील पाच महिन्यांपासून मात्र एकाही विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले नाही, विद्यार्थिनींनाही आश्वासन दिले होते, त्यांनाही कुठलाच लाभ देण्यात आला नाही. शिवाय कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही किंवा शिष्यवृत्ती दिली जाणार नाही, असे आता विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे.त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आमची फसवणूक केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणार असल्याचे सांगितले. आम्हाला न्याय द्यावा व दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थी करीत होते. निवेदनावर सचिन खरात, शीलरत्न कांबळे, विशाल राऊत, आकाश कांबळे, प्रफुल्ल ढाले, गणेश सावळे, आकाश पाईकराव, स्वप्नील लोणकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली