शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

६ मे पासून एक दिवसाआड बाजारपेठेचे नवे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST

कार्यालयीन उपस्थिती पूर्वीप्रमाणेच १५ टक्के अथवा किमान ५ कर्मचारी तर गरजेनुसार १०० टक्के ठेवता येईल. लग्नासाठी केवळ कोर्ट मॅरेजला ...

कार्यालयीन उपस्थिती पूर्वीप्रमाणेच १५ टक्के अथवा किमान ५ कर्मचारी तर गरजेनुसार १०० टक्के ठेवता येईल. लग्नासाठी केवळ कोर्ट मॅरेजला परवानगी आहे. खाजगी प्रवासी वाहतूक केवळ ई पास असल्यास ५० टक्क्यांच्या मर्यादेत, तेही अत्यावश्यक कारणासाठी परवानगी राहील. तर खासगी बसेस वाहतूक मनाई केली. आगारातून ही बस सोडता येणार नाही. इतर आगाराच्या बसेस थेट स्थानकात थांबतील. नोंदणीकृत उद्योग चालू ठेवता येतील. त्यासाठी तहसीलकडून ओळखपत्र घ्यावे लागेल.

बँका व निबंधकांना शिथिलता

बँका व दुय्यम निबंधक कार्यालय ६,८,१०,१२, १४ मे रोजी चालू राहतील. बँकांमध्ये केवळ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व व्यवहार करता येतल. इतर वेळेत कार्यालयीन कामकाज करता येईल. दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणी व इतर अनुषंगिक व्यवहारासाठी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.

नियमभंग करणे होईल बंद

जिल्हाधिकाऱ्यांच्या या नव्या आदेशामुळे बाजारपेठेला दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात असलेले निर्बंध झुगारून अनेक दुकानदार बंद शटर आडून ग्राहकी करताना दिसत होते. पालिकेच्या पथकातील लोकही कारवाई करताना थकले. मात्र ही मंडळी नियम मोडण्यास मागेपुढे पाहात नव्हती. आता तरी एक दिवसाआड बाजारपेठ सुरू राहणार असल्याने ही मंडळी नियमभंग करणार नाही, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आता कठोर कारवाई तरी गरजेची आहे.