नवे २३९ कोरोना रुग्ण; ७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:30 IST2021-04-27T04:30:51+5:302021-04-27T04:30:51+5:30

आजपर्यंत जिल्ह्यात ११ हजार ८९७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी १०२९० जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या ...

New 239 corona patients; 7 killed | नवे २३९ कोरोना रुग्ण; ७ जणांचा मृत्यू

नवे २३९ कोरोना रुग्ण; ७ जणांचा मृत्यू

आजपर्यंत जिल्ह्यात ११ हजार ८९७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी १०२९० जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या १४०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४४० जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर अन्य ४१ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅवर ठेवण्यात आले आहे.

मृतांचे द्विशतक पूर्ण

सोमवारी जिल्ह्यात विविध कोरोना रुग्णालयात सात जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आयसोलेशन वॉर्ड हिंगोली येथे वसमत तालुक्यातील हट्टा येथील ६५ वर्षीय पुरुष, हिंगोली येथील ६५ वर्षीय पुरुष, पारडा येथील ६५ वर्षीय पुरुष तर कळमनुरी येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आज कळमनुरी येथील कोविड सेंटरमध्ये तिघे दगावले. त्यात हिंगोली येथील ४० वर्षीय पुरुष, घोळवा येथील ५५ वर्षीय महिला, कळमनुरी येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकूण मृत्यूचा आकडा आता २०३ वर पोहोचला आहे.

Web Title: New 239 corona patients; 7 killed