नागनाथ अर्बन बँकेचा कर्जावरील व्याजदरात मोठ्या कपातीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:21+5:302021-02-05T07:54:21+5:30

सर्व प्रकारच्या कर्ज प्रकारात २ ते ३ टक्के कपात करून नवीन कर्जदार यात पगारदार, व्यावसायिक व इतर खातेदारांना याचा ...

Nagnath Urban Bank decides to cut interest rates on loans | नागनाथ अर्बन बँकेचा कर्जावरील व्याजदरात मोठ्या कपातीचा निर्णय

नागनाथ अर्बन बँकेचा कर्जावरील व्याजदरात मोठ्या कपातीचा निर्णय

सर्व प्रकारच्या कर्ज प्रकारात २ ते ३ टक्के कपात करून नवीन कर्जदार यात पगारदार, व्यावसायिक व इतर खातेदारांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या मंदीसदृश काळात आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठी बँकेच्या सर्व संचालकांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. ॲड. सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षा सिंधुताई सरनाईक, संचालक बाळासाहेब आरळकर, ॲड. मनोज आखरे, बापूराव बांगर, रमेश मंडले, डॉ. सत्यनारायण तापडिया, शंभूसिंह गहिलोत, सुरजितसिंह ठाकूर, सुनीता देशमुख, खंडेराव सरनाईक, महेश बियाणी या सर्व संचालकांची उपस्थिती होती. व्याजदर कपातीचा फायदा जास्तीत जास्त ग्राहकांनी घेऊन आपला व आपल्या व्यवसायाचा पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात वाटा उचलण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: Nagnath Urban Bank decides to cut interest rates on loans