किसान सभेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:22 IST2018-05-18T00:22:58+5:302018-05-18T00:22:58+5:30
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २00६ व २00८ अन्वये त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करून अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

किसान सभेचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २00६ व २00८ अन्वये त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करून अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यात म्हटले की, या अधिनियमाला १0 ते १२ वर्षे लोटल्यानंतरही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. वनजमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यात आल्या नाहीत. किसान सभेने यापूर्वीही नाशिक येथे महामुक्काम आंदोलन केले. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालयावर ठिय्या आंदोलन, आदिवासी विकासमंत्र्यांच्या घराला घेराव घातला. तर लॉंगमार्चही काढला होता. त्याची दखल घेवून मुख्यमंत्र्यांनी जमीन कसणाºयांबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यात पुढे कारवाई न झाल्यास १ जूनला कार्यालयाला घेराव घालण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कॉ.अजहर अली जामकर, सुरेश काचगुंडे, अंकुश बुधवंत, रुस्तूम राठोड, त्र्यंबक जुमडे, महादू डुमणे, उत्त्तम राठोड, मोहन चव्हाण, खंडू चव्हाण, श्रीराम चव्हाण, डिगांबर फुफाटे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
ेअवैध वाहतूक
हिंगोली - जवळा - पळशी मार्गे मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे वाहनांच्या टपावर बसवून प्रवासी नेले जात असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष आहे.