तपोवन येथे महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:57 IST2019-03-30T23:56:56+5:302019-03-30T23:57:12+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथे २८ मार्च शूक्रवार रोजी सकाळी ९ वाजता एका महिलेचा पाठीमागे जाऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

तपोवन येथे महिलेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथे २८ मार्च शूक्रवार रोजी सकाळी ९ वाजता एका महिलेचा पाठीमागे जाऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
तपोवन येथील एक महिला सकाळी स्मशानभूमीच्या जवळून जात असताना आरोपीने तिच्या मागे जाऊन वाईट नजर ठेवून तिचा पाठलाग केला. यावेळी सदर महिलेने पाठलाग का करता? असे आरोपीस विचारले असता त्यांनी सांगितले की, मी तुझ्याकडे वाईट नजरेने पाहणार असून तुझा पाठलाग करणार आहेच, तुला काय करायचे ते कर, असे तिने सांगितले. असता सदर महिलेने हट्टा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यात म्हटले की, आरोपी त्रिंबक मारोतराव कदम (४२ रा.तपोवन ता.औढा) यांनी वरील कृत्य केले. यावरून कलम ३५४ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास सपोनि गुलाब बाचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जीवन गवारे, पो.ना. शेख नय्यर, अरविंद गजभार हे करत आहेत. आरोपीस रात्री एक वाजता त्याच्या घरून अटक केली आहे.