असोला येथे महिलेस मारहाण करून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:31 IST2019-04-12T00:30:47+5:302019-04-12T00:31:04+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे एका महिलेस पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी १० एप्रिल रोजी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असोला येथे महिलेस मारहाण करून विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे एका महिलेस पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी १० एप्रिल रोजी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा तालुक्यातील असोला येथील तिघांनी संगनमत करून पाणी भरण्याच्या कारणावरून फिर्यादी महिलेसोबत वाद घालत मारहाण केली व महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेच्या पतीसही आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी उत्तम नेतणे, बाळू उर्फ नारायण नेतणे, किशोर कांबळे यांच्याविरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना शेख नयर करीत आहेत.
११ ठिकाणी छापे
हिंगोली : पोलिसांनी १० एप्रिल रोजी विविध ठिकाणी कारवाई करून १६ हजार ९१ रूपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे.
दारूबंदी कायद्या अंतर्गत पोलिसांनी हिंगोली शहर, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर व वसमत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरूद्ध दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.