शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

आता शिक्षकांना वर्गावर मोबाईलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 4:53 PM

जि.प.सह खाजगी अनुदानित, विनाअनुदानितलाही आदेश

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

हिंगोली :  वर्गावर असताना शिक्षक मोबाईलवर व्यस्त राहात असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शासन निर्णयानुसार जि.प., खाजगी अनुदानित, विनाअनुदानित सर्वच शाळांत वर्गावर असताना शिक्षकांना मोबाईलबंदी केली आहे.

२३ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सध्या जिल्हाभर गुणवत्तावाढीसाठी शिक्षण विभागासह सीईओ एच.पी.तुम्मोड प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच पथक शाळेवर धडकत आहे. गुरुजी शाळेवर वेळेवर येतात की नाही, यापासून ते त्यांनी अध्ययनस्तर निश्चितीत दिलेली गुणवत्ता फुगवटा तर नाही, याचीही तपासणी केली जात आहे. जेथे फुगवटा आढळला तेथे लागलीच समज देवून सुधारणा न केल्यास कारवाईचा इशाराही देत आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी शिक्षकांचा वर्गावरील मोबाईलही चर्चेचा विषय होता. डिजिटल वर्गात काही वेळा शिक्षकांना मोबाईलची गरज भासते. अशावेळी मुख्याध्यापकांच्या परवानगीने मोबाईल वापरता येणार आहे. मात्र त्यावरून संभाषण साधता येणार नाही. जि.प.च्याच नव्हे, तर सर्वच शाळांना हा निर्णय लागू केल्याने खाजगी शाळांतही त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. खाजगी शाळांचे शिक्षक बहुतेकवेळा त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याच्या थाटातच वावरत असतात.

गुणवत्तावाढीच्या उपक्रमासाठी निर्णयमुख्याध्यापकाच्या परवानगीविना वर्गावर मोबाईल नेल्यास संबंधित शिक्षकांना २८ मे २0१५ च्या शासन परिपत्रकातील मुद्दा क्र.३ नुसार दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. शिवाय सेवापुस्तिकेतही लाल शाईने नोंद घेण्याची कारवाई करता येते, असा इशाराही या पत्रात दिला आहे. २00४, २00९ व २0१५ मध्ये मोबाईल वापरावरून शासनाने वारंवार शिक्षण विभागा सूचना दिल्या आहेत. मात्र त्याचे पालन अनेक ठिकाणी होत नाही. आता गुणवत्तावाढीच्या दृष्टिने होत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसू नये म्हणून पुन्हा मोबाईल वापरावर बंदीचा आदेश समोर आला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदSchoolशाळाMobileमोबाइल