शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अल्पसंख्यांकांना योजनांचा लाभ द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 1:12 AM

अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गतच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले.

ठळक मुद्देहाजी अरफात शेख १५ कलमी कार्यक्रमाचा घेतला आढावा

हिंगोली : अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गतच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले.जिल्हा कचेरीत डिपीसी सभागृहात १३ डिसेंबर रोजी त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, जि.प.चे अति.मुकाअ बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते. शेख म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाच्या पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गत केवळ मुस्लिम समाजाचा समावेश नसून यामध्ये जैन, शिख, बौध्द, ख्रिश्चन आदी समाज आहे. या सर्व समाजातील नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी अल्पसंख्यांक आयोग प्रयत्नशील आहे. वक्फ बोर्डाला पूर्णवेळ अधिकारी देवून जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतीक्रमण झाल्यास अशा लोकांवर त्वरीत कठोर कारवाई करावी. अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांसाठी निधीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रशासनाने सोडवावा. जिल्ह्यातील ऊर्दू शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. उर्दू शाळांमध्ये मराठीचे तज्ज्ञ शिक्षक नेमावेत. जिल्ह्यात एका बालिकेवर अत्याचार झाला होता, अशा घटना पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या घटनेतील दोषींवर उचित कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत. बोगस मदरशांना निधी दिल्याच्या तक्रारी आहेत. तसे असल्यास मदरशासह संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, जिल्ह्याला ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, तो निधी त्याच प्रयोजनासाठी खर्च होईल याबाबत सर्व संबंधीत यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले.वसतिगृहांचे काम विद्युतीकरणासाठी रखडलेजिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधीत वाढ व्हावी यासाठी उर्दू शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या, स्वच्छतागृहे करण्याचे आवश्यकत आहे. तसेच घरकुल योजनेअंतर्गत १ हजार १७७ अल्पसंख्यांक समाजातील कुंटुंबाची निवड करण्यात आली आहे. तसेच ४२ अंगणवाड्या मंजूर असून त्यापैकी ३८ पूर्ण झाल्याची जि. प. चे अति. मुकाअ बनसोडे यांनी दिली. हिंगोली आणि कळमनुरी येथे ७६२.०९ लाख खर्च करुन अल्पसंख्यांक मुलांचे वसतिगृह बांधले असून फर्निचर, विद्युतीकरणाचे काम सुरु असल्याची माहिती कार्यकारी अभियंता घुबडे यांनी दिली. यावेळी साबांचे कार्यकारी अभियंता घुबडे, शिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के, न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMuslimमुस्लीम