वसमतमधील या परिसराला एका महिन्यात दुसऱ्यादा भूकंपाचा सौम्य धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 09:54 IST2021-07-25T09:52:53+5:302021-07-25T09:54:27+5:30
earthquake: वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे व परिसरात रविवारी सकाळी 8:22 च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून अनेक गावांना हा धक्का बसला आहे.

वसमतमधील या परिसराला एका महिन्यात दुसऱ्यादा भूकंपाचा सौम्य धक्का
कुरुंदा: वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे व परिसरात रविवारी सकाळी 8:22 च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून अनेक गावांना हा धक्का बसला आहे.गेल्या 15 दिवसाखाली असाच धक्का बसला होता या महिन्यात दुसऱ्यादा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे.11 जुलै नंतर आता 25 जुलैला दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. (Mild earthquake shakes Pangara Shinde and its environs for the second time in a month)
पांग्रा शिंदे येथे गेल्या तीन वर्षापासून सातत्याने अशाच प्रकारचे भूकंपाचे धक्के व गूढ आवाज जाणवतो, त्याचे संशोधन अध्याप भूगर्भ विभागाला लागलेले नाही.त्यामुळे हा प्रकार नित्याचा बनला आहे.आज रविवारी सकाळी 8:22मिनिटाला सौम्य भूकंपाचा धक्का पांगारा शिंदे,कुरुंदा ,वापटी,कुपटी, शिरळी, खांबाळा,डोनवाडा,कुरुंदवाडी,मरसुळ, सुकळी,कोठारी परिसरात धक्का जाणवला आहे. रात्री-बेरात्री होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक धस्तावले आहेत.एका महिन्यात हा दुसऱ्यादा भूकंपाचा धक्का बसला आहे.