औंढा तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:25 IST2025-12-11T16:20:26+5:302025-12-11T16:25:01+5:30
अधूनमधून भूगर्भातून आवाज येत असल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

औंढा तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत'
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसरात १० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यादरम्यान भूगर्भातून गूढ आवाजही आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, पिंपळदरी, वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) परिसरात अधूनमधून भूगर्भातून आवाज येत असल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) परिसरात पंधरा दिवसांपूर्वीच भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. शिवाय, या भागात अधूनमधून भूगर्भातून गूढ आवाज येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले असताना औंढा तालुक्यातील पिंपळदरी व परिसरात बुधवारी रात्री ८ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. तसेच यादरम्यान भूगर्भातून गूढ आवाजही आला. या भूकंपामुळे कुठेही हानी झाली नसल्याची माहिती आहे. परंतु ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मात्र, या भूकंपाची रिस्टर स्केलवर नोंद नसल्याचे प्रशासनाने सांगितले.